( चिपळूण )
तालुक्यातील मार्कंडी येथील तिरुमला अपार्टमेंटमध्ये परेश अनिल चतुरे (वय ३३) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
परेश चतुरे हे मूळचे शांतीनगर, लोणीखुर्द (जि. अहमदनगर) येथील रहिवासी असून सध्या मार्कंडी येथे वास्तव्यास होते. चिपळूण पोलिसांनी २४ मे रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलीस अधिक तपास करत असून, या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांत शोककळा पसरली आहे.