वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची युती आणि गोचर यांचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव असतो. काही विशिष्ट ग्रहयोग दीर्घ कालावधीनंतर तयार होतात, आणि त्यांचे परिणाम अत्यंत प्रभावशाली ठरतात. अशाच एक दुर्मीळ योगाची पुनरावृत्ती १८ वर्षांनी होत आहे “कुजकेतू योग”.
कुजकेतू योग म्हणजे काय?
मंगळ आणि केतू या दोन प्रभावी ग्रहांची युती ७ जून २०२५ रोजी सिंह राशीत होणार आहे. मंगळ या दिवशी सिंह राशीत प्रवेश करेल, तर केतू आधीपासूनच त्या राशीत भ्रमण करत असल्यामुळे हा विशेष योग तयार होईल. ७ जून २०२५ रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करताच तिथे आधीच असलेल्या केतूसोबत त्याची युती होणार आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रात “कुज-केतू योग” म्हटलं जातं.
मंगळ हा ऊर्जा, साहस, नेतृत्व आणि कृतीशीलतेचा प्रतीक आहे, तर केतू आध्यात्म, अंतर्ज्ञान, गूढशास्त्र आणि अनपेक्षित घटना सूचित करणारा ग्रह आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्यातून निर्माण होतो कुजकेतू योग, जो आकस्मिक लाभ, करिअरमध्ये उन्नती आणि आध्यात्मिक प्रगती घडवतो. काही वेळा हा योग संघर्षही निर्माण करतो, पण २०२५ मधील कुजकेतू योग काही निश्चित राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.
‘या’ ३ राशींवर कुजकेतू योगाची विशेष कृपा
मिथुन राशी
- या राशीच्या व्यक्तींना कुजकेतू योग विशेष फलदायी ठरेल.
- आत्मविश्वास, धैर्य आणि निर्णयक्षमता वाढेल.
- व्यवसायात, विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये यश मिळेल.
- भावंडांकडून सहकार्य लाभेल.
- नोकरीत वरिष्ठांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील.
- पदोन्नतीची संधी आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.
वृश्चिक राशी
- मंगळ हा या राशीचा स्वामी असल्यामुळे या राशीवर या योगाचा प्रभाव अधिक तीव्रपणे जाणवेल.
- व्यवसायात नवे प्रकल्प सुरू होतील.
- करिअर संबंधित प्रवास घडेल.
- फायदेशीर भागीदारीचे प्रस्ताव मिळतील.
- आर्थिक स्थिती सुधारेल आणि मानसिक दृष्टिकोन सकारात्मक बनेल.
- धार्मिक कार्यात सहभाग मिळेल, ज्यामुळे आत्मिक समाधान लाभेल.
तूळ राशी
- या राशीसाठी कुजकेतू योग अत्यंत शुभ आर्थिक संधी घेऊन येईल.
- उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.
- उच्च पदाची संधी किंवा नोकरीत बदल होऊ शकतो.
- मालमत्तेशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली लागतील.
- गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.
- खर्चावर नियंत्रण ठेवून योग्य बचत शक्य होईल.
- समाजात मान-सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल.
हा योग विशेषतः महत्वाचा मानला जातो कारण मंगळ हा अग्नी तत्त्वाचा ग्रह आहे, जो साहस, शक्ती आणि क्रोधाचे प्रतीक आहे. तर केतू हा एक गूढ छाया ग्रह असून मोक्ष, वैराग्य आणि भ्रम यांचा कारक आहे. जेव्हा हे दोघेही उग्र प्रवृत्तीचे ग्रह अग्नी तत्त्वाच्या सिंह राशीत एकत्र येतात, तेव्हा ही स्थिती अत्यंत विस्फोटक ठरू शकते. हा योग मेष, वृषभ यासह पाच राशींसाठी विशेषतः आव्हानात्मक ठरू शकतो. या काळात या राशींच्या लोकांचा स्वभाव चिडचिडा आणि आक्रमक होऊ शकतो, त्यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव वाढण्याची आणि करिअरमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. हा काळ आत्मसंयम, धैर्य आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. अन्यथा, क्षुल्लक वादही मोठ्या संकटात रूपांतरित होऊ शकतात.
या राशींना येऊ शकतात अडचणी!
मेष राशी
- मंगळ-केतूची युती मेष राशीच्या पंचम भावात होणार आहे, त्यामुळे
- शिक्षण आणि संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात.
- उच्च शिक्षणासाठी योजना आखणाऱ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.
- प्रेमसंबंधात मतभेद वाढू शकतात.
- कार्यस्थळी सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.
वृषभ राशी
- वृषभ राशीच्या चतुर्थ भावात हा योग होत आहे, त्यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो.
- आईच्या आरोग्याबाबत काळजी निर्माण होऊ शकते.
- हृदयविकारासारख्या आरोग्याच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.
- कोर्ट-कचेरीचे प्रश्न आणि मालमत्तेसंबंधी वाद त्रासदायक ठरू शकतात.
कर्क राशी
- कर्क राशीच्या द्वितीय भावात मंगळ-केतूची युती होत आहे, जी वाणी आणि आर्थिक स्थितीशी संबंधित असते.
- बोलण्यात ताठरपणा आणि आक्रमकता येऊ शकते, ज्यामुळे सामाजिक प्रतिमा बाधित होऊ शकते.
- आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी आवश्यक आहे.
- गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक ठरेल.
सिंह राशी
- सिंह राशीत ही युती लग्न भावात होणार असल्यामुळे स्वभाव चिडचिडा आणि आक्रमक होण्याची शक्यता आहे.
- घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात.
- वैवाहिक जीवनात वाद निर्माण होऊ शकतात.
- जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंता वाढू शकते.
- कार्यस्थळी सन्मान कमी होण्याची शक्यता असल्यामुळे संभाषणात संयम ठेवा.
टीप: वरील माहिती सामान्य राशीभविष्यावर आधारित आहे. प्रत्येकाची वैयक्तिक कुंडली आणि ग्रहस्थिती वेगळी असते, त्याप्रमाणे प्रभावही भिन्न असतो. त्यामुळे अशा योगांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. योग्य मार्गदर्शनासाठी अनुभवी ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.

