(देवळे / प्रकाश चाळके)
नाम. डॉ. उदय सामंत (पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा) व किरण सामंत (आमदार राजापूर लांजा साखरपा) तसेच कु.अपूर्वा सामंत (युवा नेतृत्व) यांचे सहकार्याने बांधकाम कामगार गृह उपयोगी भांडी संच वितरणाचा कॅम्प दि.१८ मे २०२५ रोजी विभागीय जनसंपर्क कार्यालय देवळे येथे आयोजित केला होता.
सदर कॅम्प सकाळी ९.३० ते साय. ५.३० या वेळेत अतिशय नियोजनपूर्वक पार पडला. सदर कॅम्प यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी युवा सेना तालुका श्री. प्रमुख प्रसाद अपंडकर, तालुका महिला संघटक रेश्मा परशेट्ये यांच्या योग्य नियोजनामुळे 150 लाभार्थी बांधकाम कामगारांना लाभ घेता आला. तसेच श्री. महेंद्र चव्हाण, श्री.सचिन कानसरे, श्री.समीर आंब्रे, श्री.प्रणित बेटकर, श्री. प्रामिल चव्हाण यांनी प्रसंगी मोलाचे सहकार्य केले.
ज्येष्ठ मार्गदर्शक भाई बेर्डे, उपजिल्हा प्रमुख श्री.राजेश पत्याणे, उप तालुका प्रमुख श्री.बापू लोटणकर, विभाग प्रमुख श्री राजेश कामेरकर, श्री.प्रकाश चाळके, सौ.संध्या गांगण यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना संच वितरण करण्यात आले. यावेळी १५० लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
पालकमंत्री उदय सामंत, आ.किरण (भैया) सामंत, कु. अपुर्वा सामंत यांच्यामुळेच असा कॅम्प होऊन एवढ्या बांधकाम कामगाराना लाभ घेता आल्याने लाभार्थ्यानी या सर्वाचे आभार मानले.

