(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजिकच्या कुवारबांव सुयोग सोसायटी येथे फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिन्यासह रोख रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घरना दुपारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र गंगाधर सावंत (वय 56 काजू व्यावसायिक) यांनी याची फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याने शनिवारी सकाळी 11.30 ते 1 च्या दरम्यान बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करुन लोखंडी व लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेले. यामध्ये 2 लाख रुपये रोख तसेच सोन्याचे हातातील ब्रेसलेट आणि सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला असून या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305(अ), 331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.