(रत्नागिरी)
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आलेल्या १३ बांगलादेशी घुसखोरांना, शिक्षेची मुदत पूर्ण झाल्यानंतर अखेर मायदेशी पाठवण्यात आले आहे. रत्नागिरी पोलिस आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईत ही धक्कादायक कारवाई उघडकीस आली होती.
या सर्व व्यक्तींनी भारतात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून स्थानिक परिसरात वास्तव्य केले होते. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे या घुसखोरांचा छडा लावता आला. अटक करण्यात आलेल्या सर्वांकडे कोणतेही वैध ओळखपत्र किंवा प्रवास दस्तऐवज आढळले नव्हते.
प्राथमिक चौकशी आणि संबंधित यंत्रणांच्या तपासानंतर त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. सहा महिन्यांच्या शिक्षेनंतर त्यांना बांगलादेश सरकारच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर त्यांना मायदेशी रवाना करण्यात आले आहे.

