(मुंबई)
नारायण देसाई फाउंडेशन या संस्थेतर्फे राष्ट्रीय सिनेमा संस्कृतीचे जतन संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना कलागुणांना वाव देण्यासाठी, मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने “मातृभाषा सन्मान पुरस्कार सोहळा / मराठी चित्रपट महोत्सव” चे आयोजन करण्यात आले होते.
दखलपात्र सिनेपत्रकार, जीवन गौरव, चित्रपटातील विशेष योगदान सारखे घोषित पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट – चित्रपट, सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, अभिनेता, अभिनेत्री, विनोदी / सहाय्यक अभिनेत्री, विनोदी / सहाय्यक अभिनेता, छायांकन, संकलन, रंगभूषा, संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक, पार्श्वगायिका, कला दिग्दर्शक, पार्श्वसंगीत, बाल कलाकार, प्रथम पदार्पण – दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री ई. पुरस्कार नारायण देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक आर्यन देसाई यांनी जाहीर केले. हे पुरस्कार चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत १४ मे २०२४ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संध्याकाळी साडेसहा वाजता समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
सुरुवातीला पद्मश्री उद्य देशपांडे, अभिनेते चेतन दळवी,अभिनेते अनंत जोग , अभिनेते विजय पाटकर, संकलक दिग्दर्शक संजीव नाईक, संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक, दिग्दर्शक निर्माते आर्यन देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आर्यन देसाई यांनी प्रस्ताविक केले. सर्वोत्कृष्ट चित्रकर्मी तसेच चित्रपटांना सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तसेच अभिनेते अनंत जोग यांना विशेष योगदान पुरस्कार, समीक्षा कोळंबकर यांना दखलपात्र प्रसिद्धी प्रमुख अभिनेते चेतन दळवी यांना जीवनगौरव पुरस्कार व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच दामू अण्णा मालवणकर वसंत शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अभिनेते विजय पाटकर अभिनेते सागर कारंडे अभिनेते गौरव मोरे अभिनेते अंकुर वाढवे अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांना हास्यरत्न पुरस्कार सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मातृभाषा सन्मान मराठी चित्रपट पुरस्कार
विजेते
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट
इंटरनॅशनल फालम फोक
सर्वोत्कृष्ट चित्रपट
धर्मवीर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
प्रवीण तरडे – धर्मवीर
सर्वोत्कृष्ट अभिनेता
प्रसाद ओक – धर्मवीर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सोनाली कुलकर्णी – व्हिक्टोरिया
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
गश्मीर महाजनी – सरसेनापती हंबीरराव
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
दीक्षा पुरळकर – पिकोलो
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार –
गुल्हर – विनायक पोतदार
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक
धीरज गुरव – इंटरनॅशनल फालमफोक
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता
योगेश खिलारे – इंटरनॅशनल फालमफोक
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री
प्रेम प्रथा धुमशान – शिवाली परब
सर्वोत्कृष्ट कथा
इंटरनॅशनल फालमफोक – ला रा साळुंखे
सर्वोत्कृष्ट पटकथा –
प्रवीण तरडे – धर्मवीर
सर्वोत्कृष्ट संवाद –
प्रवीण तरडे – सरसेनापती हंबीरराव
सर्वोत्कृष्ट छायांकन
महेश लिमये – सरसेनापती हंबीरराव
सर्वोत्कृष्ट संकलन
मयूर हरदास – सरसेनापती हंबीरराव
संगीत दिग्दर्शन
चिनार-महेश – आनंद हरपला (धर्मवीर)
सर्वोत्कृष्ट गीत
संगीता बर्वे – भेटला विठ्ठल – धर्मवीर
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
मानसी अत्तरडे – सरसेनापती हंबीरराव
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
विद्याधर भट्टे – धर्मवीर
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
मदन माने – सरसेनापती हंबीरराव
सर्वोत्कृष्ट गायक
सौरभ साळुंखे – आनंद हरपला – धर्मवीर
सर्वोत्कृष्ट गायिका
अपेक्षा दांडेकर – मेरी गो राउंड – लोच्या झाला रे
सर्वोत्कृष्ट अभिनेता (नकारात्मक भूमिका)
पुष्कर जोग – व्हिक्टोरिया
सर्वोत्कृष्ट भूमिका (विनोदी भूमिका)
प्रसाद खांडेकर – लोच्या झाला रे
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
उमेश जाधव – अष्टमी – धर्मवीर