(रत्नागिरी)
नविंद्रनगर, मालगुंड येथील कै. सुप्रिया श्रीपाद कुंटे (वय ८०) यांचे दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुलगा सुबोध कुंटे यांनी मातोश्रींच्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा आणि भविष्यात समाजसेवेसाठी सज्ज असलेले चांगले डॉक्टर तयार व्हावेत या उदात्त भावनेने त्यांचे देहदान केले.
आज (११ सप्टेंबर २०२५) रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे हा देहदान सोहळा पार पडला. या वेळी सागर भिंगारे, रोहित पवार, अमित पाटील, ओमकार खेऊर यांनी सुबोध कुंटे यांना मोलाची साथ दिली.
या संपूर्ण प्रक्रियेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव तसेच विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, वाहनचालक विनोद मोहिते, सौरभ जाधव व वृंदारक पेजे यांनी काम पाहिले.
हे रत्नागिरीतील ११ वे देहदान असून, कै. सुप्रिया कुंटे यांचे कुटुंब व समाजाने दाखवलेला हा आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे.

