राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. अकोले येथून राजूरकडे जात असताना त्यांची कार आणि एका ट्रकची समोरासमोर धडक झाली. तालुक्यातील विठे घाट परिसरात हा अपघात झाला. या अपघातात आमदार लहामटे यांच्या कारचे नुकसान झाले तसेच त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. या अपघातात किरण लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचार झाल्यानंतर लहामटे त्यांच्या राजूर येथील निवासस्थानी पोहोचले. या अपघातात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आ.डॉ. किरण लहामटे हे अकोलेहून (Akole) राजूरकडे जात असताना विठे घाटात त्यांच्या फॉर्च्युनर कार (एमएच.17 डीएफ 9991) या वाहनास चुकीच्या बाजूने येणार्या ट्रक (एमएच-17 टी 8496) ची समोरासमोर धडक झाली. या अपघातातुन आमदार लहामटे बचावले असुन त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
आमदार लहामटे यांचे तालुक्यातील राजुर येथे निवासस्थान आहे. मंगळवारी दुपारी अकोले येथुन ते राजुरला चालले होते. अकोल्यापासुन सुमारे दहा किमी अंतरावरील विठे घाटात त्यांच्या गाडीला समोरून चुकीच्या बाजूने येणार्या मालमोटारीने जोराची धडक दिली. या अपघातात डॉ. लहामटे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी त्यांच्या सह गाडीमधील सर्वजण बचावले आहेत.