(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचा इ. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून जाकादेवी विद्यालयात ९६.२० % गुण मिळवून सर्वप्रथम घेण्याचा बहुमान कु. अस्मिता सतिश मायंगडे हिने संपादन केला आहे. शेतकरी आणि अतिशय गरीब कुटुंबातील कु.अस्मिता मायंगडे हिच्या देदीप्यमान यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकावला कु.संस्कार पांडुरंग पानगले ९४.२० % याने तर कु. शौर्य संभाजी गणेशकर याने ९०.८० % गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला आहे.
विद्यालयातून १६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता संपादन केली आहे. शाळेतील प्रावीण्य संपादित, यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक विषय शिक्षकांचे मुख्याध्यापक नितीन मोरे,पर्यवेक्षक शाम महाकाळ, शिक्षण संस्थेचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, कोषाध्यक्ष संदीप कदम, सचिव विनायक राऊत ,सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, सर्व संचालक मंडळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

