(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंती आणि पौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ४ डिसेंबर रोजी मठात दिवसभर भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल असून, श्री स्वामी पादुकांचे अभिषेक, स्वामी नामजप पठण, महानैवेद्य अर्पण, महाआरती आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.
भक्तांनी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

