(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ व “संविधान सन्मान सभा” प्रमुख वक्ते सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रसिद्ध वकील कायद्याचे अभ्यासक सर्वोच्च न्यायालयाचे वकिल असीम सरोदे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहाने संपन्न झाले.
यावेळी विचार मंचावर प्रथमेश गावणकर, प्रमुख अतिथी व वक्ते वकिल असीम सरोदे, वकील श्रीया आवले, वकिल बाळकृष्ण निढाळकर, वकील संतोष आवले, वकिल महेंद्र मांडवकर, माजी सैनिक मा.श्री. पाटील, चाफे गावचे माजी सरपंच सुभाष रहाटे,
सहदेव वीर, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना प्रथमेश गावणकर यांनी आपण कोणत्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत इथं पर्यंत आलो.याबाबत त्यांनी दुःख दायक प्रसंग, सभोवतालची परिस्थिती, राजकीय क्षेत्रातील अनुभव, घडामोडी या सर्वांचा समाचार घेताना त्यांनी यशस्वीपणे वाटचाल केली.याबद्दल त्यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या भल्याबु-या अनुभवाची मालिका कथन केली. तेव्हा अनेकांच्या भावना अनावर झाल्या. या त्यांच्या अनुभवातून मी घडलो आहे. म्हणूनच श्री.गावणकर यांनी त्या सर्वांचेच जाहीर आभार मानले.
सभेचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांनी “भारतीय संविधान सन्मान सभा ” या कार्यक्रमात बोलताना शेतकरी,भूमिपूत्र यांचे न्याय हक्काचे दालन या प्रथमेश गावणकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी प्रथमेश गावणकर यांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे व
प्रामाणिकपणे केलेलं आहे.अतिशय परिश्रम घेऊन हे सामाजिक परिवर्तन घडवून आणले आहे. प्रथमेश गावणकर हे शिवाजी महाराजांच्या विचारांचे कार्य ख-या अर्थाने पुढे नेत असल्याचे गौरवोद्गार प्रमुख अतिथी असीम सरोदे यांनी काढले. या देशात भारतीय संविधानाने सर्वांना समान न्याय देण्याची व्यवस्था केली आहे. पोलिस यंत्रणा, शासन, प्रशाशन, निवडणूक आयोग,
न्यायालये यांनी संविधानिक पद्धतीने नैतिकतेला धरुन न्याय दिला पाहिजे. ज्यांचे चुकीच्या पद्धतीने वागणं असेल तिथं तिथं आम्ही बोलणारच असा इशाराही वकिल असीम सरोदे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिला.
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व निसर्ग रम्य कोकणाचे हे वैभव जतन करण्यासाठी आपल्या जमिनी वाचवा, पर्यावरण, पर्यटन यातून विकास करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले.
प्रथमेश गावणकर यांच्या शेतकरी भूमिपूत्र यांचे न्याय हक्काचे दालन या कार्यालयात शेतकऱ्यांना जमीनी बाबतच्या कामकाजात वकीलांचा मोफत सल्ला मिळणार असून या भागातील नागरिकांना एक चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून तमाम जनतेचे नेतृत्व प्रथमेश गावणकर यांच्या कार्यप्रणालीचे या भागातील नागरिकांनी मनापासून अभिनंदन केले व आभार मानले आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मा.शेख यांनी अतिशय सुंदर समालोचनाने केले. या कार्यक्रमाला प्रथमेश गावणकर यांचे कुटुंबीय मंडळी उपस्थित होती. तसेच या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी हजेरी लावली, तर यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

