(साखरपा / वार्ताहर)
ओम श्री श्री 1008 महामंडलेशवर सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती यांचा सत्संग कार्यक्रम कोंडगाव येथे पार पडला. 9 मे ते 11 मे यादरम्यान मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. नेरुळ नवी मुंबई याठिकाणी महाराजांचा मठ व श्री दत्त मंदिर आहे. याठिकाणावरुन बाबांचे अध्यात्मिक, हिंदू जनजागृती,नशा मुक्ती आदी कार्य अखंडपणे सुरु असते. त्यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यात महाराजांनी आपले कार्य पोहचवले आहे. त्यामुळे महाराजांचा हजारो अनुयायी आहेत.
आपल्या गावात सुद्धा हे कार्य अविरत पणे झाले पाहिजे या हेतूने वर्षातून एकदा गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाची सुरूवात 9 मे जोयशीवाडी येथे झाली. त्याठिकाणी दिवसभर सत्संग, महाप्रसाद, आरती कार्यक्रम पार पडले. दिनांक 10 मेला शिवलीला अमृतगर्धांचे पारायण, 64 लोकपारायण, महारआरती, महाप्रसाद, भजन कार्यक्रम पार पडले. आज 11 मे शिव अभिषेक, सद्गुरू पूजन, सहस्त्र दल तुलसी अभिषेक पादुकावर, गायत्री महायज्ञ्, वैष्णव पूजन, अक्षय महाराज भोसले प्रवचन, व्यसन मुक्तीवर नाटिका, आरती, महाप्रसाद कार्यक्रम पार पडले. मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. दास दिगंबर स्वामी यांच्या कार्याचे गुणगान यावेळी उपस्थित मान्यवरानी केले व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.