(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जि.प. गटातील सर्वात मोठा मतदार असलेल्या दाभोळे गावचे सरपंच राजेश रेवाळे, उपसरपंच किरण दाभोळकर यानी आ. किरण सामंत यांच्या विकास कामाच्या धडाक्याने प्रेरित होवुन शिवसेनेत प्रवेश केला.
नुकताच दाभोळे गावचे सरपंच राजेश रेवाले तसेच उपसरपंच किरण दाभोळकर तसेच राजेश रेवाले यांचे समर्थक राजेश सुकम यांचा आमदार किरण उर्फ़ भैय्या सामंत तसेच अण्णा सामंत यांच्या प्रमुख उपश्तितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
गावच्या विकासासाठी आम्ही या पूढे कायम आ. भैय्या सामंत यांच्याबरोबर राहणार असल्याचे सरपंच राजेश रेवाळे उपसरपंच किरण दाभोळकार यानी म्हटले आहे. यावेळी पंकज देवळेकर शुभम गांधी, काशिनाथ सकपाळ उपस्थित होते.