(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कसबा (ता.संगमेश्वर) येथील श्री देव टोळभैरव मंदिरामध्ये श्री टोळभैरव उत्सव सोहळा सोमवार दि.२ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवानिमित्त षोडश पुजा श्री मा. मु. ओंकार स्वामी यांचे प्रमुख उपस्थितीत महाअभिषेक पूजा, आरती व मंत्रपुष्पांजली, दु. १ते ३ महाप्रसाद, श्री नगिधरी भजन मंडळी सुतारवाडी यांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव टोळभैरव मंदिर व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.