( देवरुख / प्रतिनिधी )
शिक्षण विभाग रत्नागिरी व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कुल देवरुख व सृजन विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन सृजन सायन्स सेंटर, देवरुख येथे संस्था अध्यक्ष सदानंद भागवत यांचे अध्यक्षतेखाली आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक मेंगाणे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
या उदघाटन सोहळ्याला जिल्हा परिषद,शिक्षण विभाग रत्नागिरी चे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. प्रदीप पाटील (उपशिक्षणाधिकारी माध्यमिक), नरेंद्र गावंड (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक), गट शिक्षणाधिकारी विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, तानाजी नाईक, केंद्र प्रमुख अभिमन्यू शिंदे व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भोसले, संस्था सचिव शिरीष फाटक, तसेच शाळा समिती चेअरमन सौ नेहा जोशी व सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
या उदघाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण विज्ञान दिंडी हे होते. ही विज्ञान दिंडी न्यू इंग्लिश स्कुल, देवरुख येथून सुरु होऊन संपूर्ण बाजारपेठेला प्रदक्षिणा करत सृजन सायन्स सेंटरला पोहचली, त्यानंतर उदघाटनाच्या कार्यक्रमात दीपक मेंगाणे (शि.अ. माध्यमिक) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये दीपक मेंगाणे यांनी विज्ञान व आजची जीवन शैली यावर भाष्य केले, त्यानंतर जिल्हा विज्ञान मंडळाचे कार्यवाह सोकासने यांनी मार्गदर्शन केले, गट शिक्षणाधिकारी(पं. स. देवरुख) विजय परीट यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी या सेंटरची पार्शभूमी सांगून या सेंटर च्या उभारणीत कोणी कोणी व कसे योगदान दिले याबाबत सांगितले व मुलांनी इथे येऊन आपल्यातील शास्त्रज्ञ जागृत करावा व आपल्या योगदानाने देश प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे सृजन विज्ञान केंद्रामध्ये सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून आधुनिक तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभारणार असल्याचे जाहीर केले.

