(गुहागर / रामदास गमरे)
गुहागर जिल्ह्यातील बौद्ध समाजातील तरुणांच्या कलागुणांना उत्तेजन देऊन त्यांना खेळाचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी तसेच गरीब तळागाळातील खेळाडूंना कॅम्प प्रशिक्षण यासाठी गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत खेळाडू सिद्धार्थ सिडकोजी पवार यांच्या शुभहस्ते गुहागर बुद्धिस्ट प्रीमियर लीगच्या प्रथम पर्वाचा उद्घाटन सोहळा दि. ९ मे २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता गोल्डन पार्क मैदान, शृंगारतळी येथे संस्था अध्यक्ष भूषण पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते अश्मा रमजान मुजावर, शीतल सिद्धार्थ पवार, बौद्धजन सहकारी संघाचे माजी विश्वस्त, बौद्धजन मागासवर्गीय नागरी पतसंस्थेचे संचालक व सम्यक कोकण कला संस्थेचे माजी महासचिव, बौद्धजन पंचायत समितीच्या शिवडी गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, बौद्धजन सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक सुनील जाधव, आर्मी सैनिक संघटनेचे एकनाथ सकपाळ, दीपक सकपाळ, निचिता गमरे, तालुक्याचे माजी चिटणीस महेंद्र मोहिते आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
सदर प्रीमियर लीगचे समालोचन गीतेश गौतम कदम (पेवे), नरेश पवार (तळवली) यांनी अत्यंत लाघवी व प्रभावीपणे सादर केले, समीर पवार (तळवली) व सागर पवार (वेलदूर) व जाधव यांनी पंच म्हणून पारदर्शक पद्धतीने काम पार पाडले. कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष भूषण पवार, चिटणीस मयूर शैलेश गमरे, सागर सिद्धार्थ पवार आणि माजी सैनिक, तालुका संघाचे माजी अध्यक्ष व प्रमुख सल्लागार सुनील जाधव व त्यांचे सहकारी यांचे मोठे योगदान या कार्यक्रमाला लाभले असून त्यांनी व त्यांच्या कमिटीने अथक परिश्रमाने सदर प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे सदर प्रीमियर लीगकरता ग्रुप A मधून समता इलेव्हन, रमाई वॉरियर्स, शार्वील इलेव्हन, ब्लु स्टार इलेव्हन तर ग्रुप B मधून अभिनव वॉटर प्युरीफायर्स, सिद्धार्थ इलेव्हन, जिज्ञासा इलेव्हन, आराध्य इलेव्हन या संघाचे संघमालक आपले संघ घेऊन उपस्थित होते, सदर प्रीमियर लीग ९ मे व १० मे अश्या दोन दिवसात होणार असून ग्रामीण भागातील कसलेले खेळाडू आपल्या कौशल्याचे प्रदर्शन दाखवत आहे. प्रेक्षकांकडूनही त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे अनेक सामाजिक, राजकिय कार्यकर्त्यांनी ही सदर प्रीमियर लीगला भेट देऊन सदर उपक्रमाचे कौतुक केले तसेच समाजातील सर्वच स्तरातून सदर प्रीमियर लीगला उस्फुर्त प्रतिसाद मिळून त्याचे कौतुक होत आहे.