(गुहागर)
ए. जी. हायस्कूल दापोली या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे सेवानिवृत्त शिक्षक श्री. महाडिक यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अंध व्यक्तींसाठी लेखन व वाचन करण्यासाठी ब्रेल लिपीचा वापर कशा पद्धतीने केला जातो, याची माहिती व प्रात्यक्षिक वाचनाद्वारे करून दाखविले. श्री. महाडिक आपल्या स्वतःच्या अंधत्वावर मात करून एम. ए. बी. एड. पर्यंतचे शिक्षण घेऊन आपले शिक्षण क्षेत्रातील कार्य पूर्ण केले.
विद्यार्थ्यांनी ब्रेल लिपीतील पुस्तक प्रत्यक्ष हाताळले व माहिती मिळवली अतिशय मंत्रमुग्ध होऊन सर्व विद्यार्थी श्री. महाडिक यांचे मार्गदर्शन व मनोगत ऐकत होते. त्यांना मदत करणारे सेवानिवृत्त शिक्षक श्री. महाडकर यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. जोगळेकर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. गायकवाड यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित केले. कलाशिक्षक श्री. बुरटे यांनी त्यांचा परिचय करून दिला. श्री.गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

