(रत्नागिरी)
रत्नागिरीतील प्रवाशांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! गेली ७ वर्षे प्रतिक्षेत असलेले अत्याधुनिक एस.टी. बसस्थानक येत्या ११ मे रोजी प्रवाशांसाठी खुले होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नव्या बसस्थानकाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. सुमारे १७ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प निर्माण एन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या सव्वा वर्षांत या स्थानकाचे बांधकाम पूर्ण करून दिले आहे. संपूर्ण बसस्थानकात दोन कँटिन, दोन पोलिस चौक्या, दोन आरक्षण खिडक्या, दोन स्वच्छतागृहांसह विश्रांतीगृह, पार्सल आणि कंट्रोल रूमची व्यवस्था आहे.
📍 बसस्थानकाची वैशिष्ट्ये:
🔹 खर्च – ₹१७ कोटी
🔹 एकूण १८ प्लॅटफॉर्म
🔹 १० वेगवेगळ्या दुकानांचे गाळे१७
🔹 आरक्षण खिडक्या, पार्सल विभाग, कंट्रोल रूम
🔹 स्वच्छतागृह, उपहारगृह, थंड पाण्याची सोय
🔹 महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ – वातानुकुलित सुविधा, बाळाला दूध पाजण्यासाठी खास जागा
🔹 सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना
गेल्या अनेक वर्षांपासून उन्हातान्हात बसथांब्यावर उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. नव्या बसस्थानकामुळे रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.