( मुंबई )
राज्यात 15 जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची (Three Language Formula) अंमलबजावणी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी ते आठवीसाठी विषय योजना, शालेय कामाचे दिवस आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत त्रिभाषा धोरणाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यमान अभ्यासक्रमच लागू राहील, असे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या वापरात असलेली पाठ्यपुस्तके आणि भाषा धोरण पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे.
तिसऱ्या भाषेबाबत सध्याची स्थिती कायम
समितीच्या शिफारशी आणि शासन निर्णयानुसार तिसऱ्या भाषेबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत प्रचलित धोरणच लागू राहणार आहे. इयत्ता 5वीपासून पुढील वर्गांमध्ये सध्या असलेली तिसरी भाषा पद्धती तशीच सुरू राहील. पूर्वीचा ‘कार्यअनुभव’ विषय आता ‘कार्यशिक्षण’ या नावाने ओळखला जाणार आहे.
इयत्ता 3 ते 5 साठी विषय रचना
मराठी माध्यम
- मराठी (प्रथम भाषा)
- इंग्रजी (द्वितीय भाषा)
- गणित
- प्रचलित पद्धतीनुसार तिसरी भाषा
- आपल्या सभोवतालचे जग भाग 1
- आपल्या सभोवतालचे जग भाग 2
- कलाशिक्षण
- शारीरिक शिक्षण व निरामयता
- कार्यशिक्षण
इंग्रजी माध्यम
- इंग्रजी (प्रथम भाषा)
- मराठी (द्वितीय भाषा)
- गणित
- प्रचलित पद्धतीनुसार तिसरी भाषा
- आपल्या सभोवतालचे जग भाग 1
- आपल्या सभोवतालचे जग भाग 2
- कलाशिक्षण
- शारीरिक शिक्षण व निरामयता
- कार्यशिक्षण
इयत्ता 6 ते 8 साठी विषय रचना
मराठी माध्यम
- मराठी (प्रथम भाषा)
- इंग्रजी (द्वितीय भाषा)
- प्रचलित पद्धतीनुसार तिसरी भाषा
- गणित
- विज्ञान
- सामाजिक शास्त्र
- कलाशिक्षण
- शारीरिक शिक्षण व निरामयता
- कार्यशिक्षण
इंग्रजी माध्यम
- इंग्रजी (प्रथम भाषा)
- मराठी (द्वितीय भाषा)
- प्रचलित पद्धतीनुसार तिसरी भाषा
- गणित
- विज्ञान
- सामाजिक शास्त्र
- कलाशिक्षण
- शारीरिक शिक्षण व निरामयता
- कार्यशिक्षण
शैक्षणिक धोरणावर लक्ष
या निर्णयामुळे शालेय स्तरावरील भाषाशिक्षण धोरणात तात्पुरता स्थैर्य येणार असून, त्रिभाषा सूत्राबाबत अंतिम धोरण ठरेपर्यंत सध्याची व्यवस्था कायम राहणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून पुढील काळात यासंदर्भात अधिक स्पष्टता दिली जाण्याची शक्यता आहे.

