(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 17 वर कशेडी घाटात गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेले कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्र आता कशेडी गाव हद्दीतील नवीन मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वरील भुयारी मार्गालगत नवीन वास्तूत स्थलांतरित करण्यात आले आहे. कशेडी बंगला ग्रामस्थांनी पोलिस कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणादरम्यान नवीन महामार्ग भोगाव हद्दीतून कशेडी भुयारी मार्गे जात आहे. कशेडी घाटातील यापूर्वीपासून कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्र नवीन महामार्गावर कशेडी गाव हद्दीत हॉटेल अनुसया जवळ शनिवारी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कशेडी भुयारी मार्गे होत असल्याने कशेडी पोलिसांना महामार्गासह कशेडी भुयारी मार्गावर गस्त ठेवण्यासाठी महामार्ग प्रशासनाकडून नवीन वास्तूची निर्मिती करून कशेडी घाटमाथ्यावर असलेला कशेडी पोलीस टॅप स्थलांतरित आल्याने कशेडी ग्रामस्थांकडून कशेडी टॅपचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे, पोलीस नाईक शंकर कुंभार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय मोरे, राजन माजळकर, गजानन रामागडे, अनिकेत मोहिते, संजय चिकणे, पोलीस मित्र महेश रांगडे आदीना कशेडी बंगलातील ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कशेडीचे पोलीस पाटील संदेश दरेकर, प्रवीण मोरे, मुकुंद मोरे, निलेश अजगनकर, दिलीप दरेकर, सुरेश दरेकर, विष्णू सकपाळ यांनी उपस्थित होते.