(संगमेश्वर / एजाज पटेल)
अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्या दोघांच्या संगमेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या धडक कारवाईत 504 ग्राम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ व दुचाकी असा एकूण 77,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील आरवली पुलाखाली करण्यात आली.
समाजामध्ये तरूण पिढी अंमली पदार्थ सेवनाच्या अधिन होत असल्याने महासंचालक महाराष्ट्र मुंबई यांनी अमंली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हामध्ये पोलीस अधिक्षक श्री. धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक श्रीम जयश्री गायकवाड, पोलीस उपअधिक्षक रत्नागिरी श्री निलेश माईनकर यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे संगमेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवप्रसाद पारवे, परि. पोलीस उपअधिक्षक हे अधिकारी व अंमलदार यांचेसह गोपनीय माहिती मिळाल्याने आरवली बाजारपेठ, आरवली रेल्वेस्टेशन ता. संगमेश्वर येथे गस्त घालीत असताना त्यांना मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली पुलाखाली उभ्या असलेल्या हिरो एचएफ डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम. एच०८/एजे/३३९८ वरील दोन इसम संशयीत हालचाली करताना दिसुन आले.
सुभाष बाबु लोंढे, वय ४५ वर्षे रा. खेरशेत ता.चिपळुण, जि. रत्नागिरी व अमित कुमार नागेश्वर साव वय-३० वर्षे रा.ग्राम रामगढ शिवमंदिर शेजारी पोस्ट कवळ जि. पलामु राज्य झारखंड सध्या रा. कोळबे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी असे संशयितांची नावे असून त्यांची संशयास्पद हालचाल आणि त्यांनी परिधान केलेल्या शर्टाच्या आत काही तरी लपवले आहे हे पोलिसांच्या नजरेतून न चुकल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता शर्टाच्या आत लपवून ठेवलेल्या पिशवीत 241 ग्राम वजन असलेले गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आले.
त्यास ताब्यात घेवून सदरचा गांजा कोठुन आणला याबाबत पोलिसांनी सुभाष बाबू लोंढे व अमित कुमार नागेश्वर यांच्याकडे चौकशी केली असता त्यानी सदरचा गांजा अंमली पदार्थ हा यासिन महामुद काद्री, रा. अडरेकर मोहल्ला, सावर्डे, ता. चिपळुण यांचेकडून आणत असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी आपला मोर्चा सावर्डे येथील आडरेकर मोहल्ला येथे राहत असलेल्या यासिन महामुद काद्री, यांच्या घराकडे वळवला व त्या ठिकाणी आजुबाजुच्या परिसराची पहाणी केली असता त्या ठिकाणी पोलिसांना २६३ ग्रॅम वजनाचा गांजा सदृष्य पदार्थ मिळून आला.
एकूण 504 ग्राम वजन असलेला गांजा सदृश्य पदार्थ, एक दुचाकी असा 77 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून संशयितांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
संगमेश्वर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,पोलीस उपअधिक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनखाली संगमेश्वर पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे,पोलीस उपनिरक्षक प्रशांत शिंदे,पोलीस हेड कॉन्सटेबल सचिन कामेरकर, पोलीस हेडकॉन्सटेबल विनय मनवळ,पोलीस हेड कॉन्सटेबल सतीश कोलगे, पोलीस हेड कॉन्सटेबल किशोर जोयशी,पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास बरगाले, महिला पोलीस नाईक क्रांती सावंत,पोलीस कॉन्सटेबल बाबूराव खोंदल, पोलीस कॉन्सटेबल राहुल खरपे यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली.