( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त सहभागामुळे उत्साहपूर्ण वातावरणा संपन्न झाल्या. चार दिवशीय या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध इनडोअर व आउटडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ क्रिकेट सामन्याने करण्यात आला.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख प्रा.धनंजय दळवी यांनी करताना, क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आणि आयोजित विविध स्पर्धांबाबत सविस्तर माहिती दिली. लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी श्रीफळ वाढवून, तर उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली. यानंतर प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील खेळाचे महत्व आणि खेळातील करिअरच्या संधी याबाबत सविस्तर विवेचन केले. याप्रसंगी प्रा. विजय मुंडेकर व क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारीआणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवात वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत अनुक्रमे विजेते व उपविजेते झालेले विद्यार्थी व वर्ग पुढील प्रमाणे:- वैयक्तिक स्पर्धा:
१. बुद्धिबळ(मुले)- वेद लिंगायत, आशीर्वाद पवार. २.कॅरम: एकेरी, मुले- आदित्य जाधव, अथर्व बंडबे.मुली- गायत्री निवळकर, वेदा आंबवकर. मैदानी स्पर्धा – १. १०० मी. धावणे – मुले, वेदांत गवंडी, अनुष माईन. मुली – सृष्टी आग्रे, स्नेहा गावडे.२. २०० मी. धावणे मुले – वेदांत गवंडी, अनुष माईन.३. ४०० मी. धावणे मुले- वेदांत गवंडी, अनुष माईन.मुली – दिव्या सनगले, पूर्वा वेंद्रे. ४. ८०० मी. धावणे मुले- देवदास पोवार, अभिषेक आग्रे.मुली- सानिका सनगले, सानिका आग्रे.५. थाळीफेक मुले- सार्थक आडशे, ओम लिंगायत.मुली- पूर्वा वेंद्रे, सानिका सनगले.६. गोळाफेक मुले – सार्थक आडशे, समृद्ध करंबेळे.मुली – अनुष्का अंकुशराव, भारती गोरे. ७. लांब उडी मुले- नितीन घाग, वेदांत गवंडी
सांघिक स्पर्धा:१. कबड्डी: मुले – ११वी वाणिज्य- ‘ब’, १२वी वाणिज्य- ‘ब’. मुली – १२वी संयुक्त, ११वी कला.२. क्रिकेट: मुले – १२वी वाणिज्य, ११वी वाणिज्य. मुली १२वी संयुक्त, ११वी कला.३. खो-खो मुले ११वी कला, १२वी वाणिज्य. मुली १२वी कला, ११वी कला. ४. रस्सीखेच मुले – १२वी वाणिज्य- ‘ब’, १२वी संयुक्त. मुली १२वी संयुक्त, १२वी वाणिज्य-‘ब’. ५. व्हॉलीबॉल मुले – ११वी वाणिज्य- ‘ब’, १२वी वाणिज्य- ‘ब’
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांच्या नियोजन व मार्गदर्शनानुसार हा ४ दिवसाचा भरगच्च क्रीडा महोत्सव शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. वसंत तावडे, प्रा. शिवराज कांबळे, संजय इंदुलकर, प्रा. धनंजय दळवी यांच्यासह विद्यार्थी स्वराज्य मंडळ सचिव अन्वी प्रसादे, क्रीडा प्रतिनिधी सौरव झेपले, सदस्य केदार गुरव मिलिंद जांगळी, समीक्षा भिसे, सहाय्यक हेमंत कदम व सहकारी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. क्रीडा महोत्सवाच्या उत्तम आयोजनासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व सहाय्यकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई आणि प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

