(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील शिंपणे उत्सव आणि पवित्र रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन झाले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे लोकप्रिय पोलीस उप अधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन करण्यात आले.
आज सायंकाळी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या संगमेश्वर पोलीस ठाण्यापासून पथसंचलनाला सुरुवात झाली. मुंबई-गोवा महामार्गावरून सोनवी चौक, संगमेश्वर बाजारपेठ रस्ता, शहर अंतर्गत रस्ता, आदी सार्वजनिक व लोकवस्ती ठिकाणाहून पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कॉन्सटेबल, पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्सटेबल यांनी पथसंचलन केले
पोलीस दलाने संगमेश्वर येथील प्रसिद्ध शिंपणे उत्सव आणि रमजान ईद च्या बंदोबस्ताची जय्यत तयारी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वासाची भावना निर्माण व्हावी, यासाठी पथसंचलन करण्यात आले आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप अधिक्षक शिवप्रसाद पारवे, पोलीस उप निरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस उप निरीक्षक राजेश शेलार, पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस उप निरीक्षक प्रशांत शिंदे आदी पुरुष पोलीस व महिला पोलीस कर्मचारी यात सहभागी झाले होते.