(तरवळ /अमित जाधव )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मालगुंड चा इयत्ता १२ वी (कला व वाणिज्य) शाखेचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२५ निकाल १००% लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून ज्युनिअर कॉलेज ची १००% निकालाची परंपरा या ही वर्षी कायम राखली आहे.
मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मधील कला शाखेतून प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक सुजल शैलेश पाष्टे ७१.५०%, द्वितीय क्रमांक धनश्री किरण सावंत ६७.५० %, तृतीय क्रमांक तन्वी दीपक रेवाळे ६४.५० % तर वाणिज्य शाखेतील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक गौरी दिनेश नेवरेकर ८८%, द्वितीय क्रमांक समीक्षा महेंद्र शितप ८४% , तृतीय क्रमांक सविता राजू मांजरेकर ८१.३३%. सदर परीक्षेला कला शाखेतून ३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर वाणिज्य शाखेतील ३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उज्ज्वल यशाबद्दल व ज्युनिअर कॉलेजची १००% निकालाची परंपरा कायम राखली त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम तसेच सर्व संचालक मंडळाने या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.