(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील भव्य क्रिडा मैदानात परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खंडाळा अर्बन बँक पुरस्कृत क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर २२ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत अतिशय उत्साहात व यशस्वीपणे पार पडले.
याप्रसंगी खंडाळा अर्बन बँकेचे चेअरमन निवृत्ती पांडूरंग खारटवकर व बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वृषभ खारवटकर, प्राचार्य शिवाजी जगताप, पर्यवेक्षक, प्रा. आनंदा पाटील, क्रीडाशिक्षक डॉ. राजेश जाधव, पल्लवी बोरकर व सर्व शिक्षक आणि १५० क्रीडा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी श्री निवृत्ती खारवटकर म्हणाले, अशी क्रिडा शिबीरे होणे आवश्यक आहे. मोबाईल वरून मुले बाहेर पडून मुले मैदानात आली पाहिजे, तरच त्यांचा व्यक्तीमत्व विकास होवू शकतो. दरवर्षी तालुक्यातील मुलांना ऑगस्टमध्ये मॅरॉथॉन स्पर्धेची आपण तयारी करू त्यासाठी लागणारे सहाय्य खंडाळा अर्बन बँक करेल असे त्यांनी आश्र्वासित केले. या शिबीराच्या यशस्वी नियोजनाबददल प्रख्यात क्रीडाशिक्षक डॉ. राजेश जाधव यांचे कौतुक केले.
यावेळी प्रशिक्षणार्थी नैतिक मांजरेकर म्हणाला, आम्हांला येथे दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण मिळाले. संपूर्ण आठवडाभर सकस अल्पोपहार देण्यात आला. या शिबीरास श्री विलासराव कोळेकर, डॉ. विकी सावंत, सरपंच गणेश वाडकर, जिल्हा परिषद माजी सभापती सौ. ऋतुजा राजेश जाधव, पल्लवी बोरकर आदी मान्यवरांनी शिबीरास भेटी देऊन आनंद व्यक्त केला .सर्वच सहभागी क्रीडा प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणाविषयी समाधान व्यवत्त केले. मुख्याध्यापक शिवाजी जगताप यांनी प्राशिक्षणार्थी, आयोजक, व बँकेचे विशेष कौतुक केले. पर्यवेक्षक प्रा. आनंदा पाटील यांनी संस्थेचे बँकेचे आभार मानले.