(दापोली)
तालुक्यातील आंजर्ले प्रभागातील विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा एम.के हायस्कूल आंजर्ले येथे माजी गटशिक्षणाधिकारी तथा प्रभाग विस्तार अधिकारी श्री. आण्णासाहेब बळवंतराव यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. २९ एप्रिल मंगळवार रोजी आंजर्ले प्रभागातील विविध स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा आंजर्ले येथील एम के हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आंजर्ले प्रभागाचे विस्तार अधिकारी श्री.अण्णासाहेब बळवंतराव व कांगवई केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.दिनकर क्षीरसागर, आडे पाडले केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. पालशेतकर, सुकोंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. प्रमोद किरडवकर, केळशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संदीप तळदेवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर एम के हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.संदिप गोरिवले अध्यक्षस्थानी होते, तर श्री. प्रमोद जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्य गीत व प्रार्थना एम के हायस्कूलच्या गीत मंचाने सुरेख आवाजात केली, मुख्य कार्यक्रमामध्ये vds,पाचवी शिष्यवृत्ती, इस्त्रो-नासा, RTS, नवोदय अशा विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान माजी गटशिक्षणाधिकारी तथा विस्तार अधिकारी श्री.अण्णासाहेब बळवंतराव यांच्यामार्फत करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे…
व्हिजन दापोली इयत्ता चौथी तालुका गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थी-
1) वरदा संदीप देशपांडे (शाळा आंजर्ले नं. १)
2) आराध्या अरविंद घरवे (शाळा मुर्डी नंबर 1)
3) स्पृहा संदीप पेंडसे (शाळा मुर्डी नंबर 1)
4) विधी संदेश पडळकर (शाळा केळशी नंबर १)
5) सिद्धार्थ सचिन घरवे (शाळा मुर्डी नंबर 1)
6) आराध्य अनिल सावंत (शाळा पिचडोली)
7) रुद्र दत्त रामेश्वर परांजपे (शाळा आंजर्ले नंबर १)
8) नफीस नियाज मुकादम (शाळा मांदिवली उर्दू)
9) वीरा मनोज रुके (शाळा भोमडी)
नवोदय मध्ये निवड झालेले विद्यार्थी
1) प्राप्ती प्रमोद जाधव (शाळा सुकोंडी बोरथळ)
2) विनीत विनय राणे (शाळा विरसई)
इस्रो भेटीसाठी निवड झालेली विद्यार्थी
1) विनीत विनय राणे (शाळा विरसई)
नासा अमेरिका भेटीसाठी निवड झालेली विद्यार्थी
1) जान्हवी राजेंद्र तांबुटकर (शाळा विरसई)
2) अथर्व गणेश तांबिटकर (शाळा विरसई)
रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालेली विद्यार्थी
1) जान्हवी राजेंद्र तांबुटकर (शाळा विरसई)
2) सृष्टी सुभाष पिंपळकर (शाळा विरसई)
3) शिवानी गणेश मांडवकर (शाळा केळशी नंबर १)
तसेच तालुकास्तरावर आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेले श्री.विनय राणे सर, श्री.प्रमोद किरडवकर सर,सौ. स्नेहा तळदेवकर मॅडम,सौ.कविता मयेकर मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला.
सन्मान सोहळ्याचे प्रमुख श्री.अण्णासाहेब बळवंतराव यांनी दापोली तालुक्यात आंजर्ले प्रभागाने स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम प्रदर्शन केल्याबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचा शेवट या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गोरिवले यांच्या भाषणाने झाला.