(दापोली)
तालुक्यातील सन्मित्र विकास मंडळ आणि धनश्री महिला मंडळ आगरवायंगणी, निगुडभोमवाडी मंडळाचे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष, श्री साईबाबा मंदिराचा 12 वा वर्धापनदिन सोहळा आणि श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. यावेळी आमंत्रित पाहुण्यांचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंडळींचा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि माहेरवाशिनिंचा सन्मान यशस्वी संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आदरातिथ्य सन्मित्र विकास मंडळ आणि धनश्री महिला मंडळ आगरवायंगणी, निगुडभोमवाडीच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमास गृहराज्य मंत्री, नामदार योगेशदादा कदम यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई कदम, दीप्तीताई निखार्गे, चारुता कामतेकर, ममता शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली.
ग्रुप ग्रामपंचायत आगरवायंगणीच्या माध्यमातून 15 वित्त आयोगातून मंदिरासमोरील पेवर ब्लॉक आणि सभा मंडपाचे बांधकाम करण्यात आले. त्याचे उदघाटन शिवसेना दाभोळ मुंबई विभाग विभागसंघटक किशोर निवाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभाग समन्व्यक अशोक टेमकर, ग्रुपग्रामपंचायत आगरवायंगणी सरपंच आणि विभागप्रमुख संतोष आंबेकर, माजी सरपंच दर्शनाताई पवार, पोलीसपाटील विजय महाडिक, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम टेमकर, सोसायटी चेअरमन रमेशदादा पवार, कुणबी प्रगती मंडळ दाभोळ विभाग मुंबई अध्यक्ष गोविंद बहिरमकर, ग्रामीण अध्यक्ष विनायक ठोंबरे, ग्रामसेवक संघ अध्यक्ष प्रकाश आदावडे गुरुजी, मुंबई अध्यक्ष विलास आदावडे, चिखलगाव ग्रामपंचायत सरपंच दिनेश आडविलकर, उपसरपंच दीपक खळे, मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष आणि पुजारी सहदेव पाते, मुंबई अध्यक्ष प्रभाकर आंबेकर, महिला अध्यक्षा सुखदा आंबेकर, विनोद आंबेकर गुरुजी, पांडुरंग आदावडे, अशोक मते, सुनील आंबेकर, प्रफुल्ल पाते, उदय अदावडे, प्रदीप आंबेकर, रोशन आंबेकर, गणेश पाते, महेश आंबेकर, मनोहर मते, संजिता पाते, वैष्णवी आदावडे, अशोक जाधव, विनायक निवाते, गंगाधर केबळे, शाखा प्रमुख एकनाथ पवार, सुरेंद्र किल्लेकर, डॉ. राजेंद्र खांडेकर, कृष्णा बिरवाडकर, गणेश पवार गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत पवार, रसिका खळे, अजय शिगवण, मधुकर खळे, सुधीर शिगवण, संतोष खळे, सुरेश खळे, विनोद भांबीड, महादेव भांबीड, संतोष महाडिक, प्रकाश महाडिक, शिवराम आदावडे, विनोद आंबेकर, संतोष धुमाळ, प्रभाकर येलवे, चरदास येलवे, सुबोध खांडेकर, प्रकाश गुरव उपस्थित होते.
सन्मित्र विकास मंडळ आणि धनश्री महिला मंडळ आगरवायंगणी, निगुडभोमवाडी मंडळाच्या वतीने सर्व पाहुणे मंडळींचे, देणगीदारांचे, शुभचिंतकांचे, हितचिंतकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.