(दापोली)
जिल्हा परिषद शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होय. इथे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी दिली जाते. परीक्षेतील गुणांसह, गाभाभूत घटक, जीवन कौशल्य आदिंची जडणघडण ही मराठी शाळेत होत असते. राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता आदि, जीवनमुल्यांची जोपासना व्हावी यासाठी दापोली तालुक्यातील जि.प.शाळा साखळोली नं,१ शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव अंतर्गत तयार केलेल्या तिरंगी राख्या सलग तिसर्या वर्षीही सिमेवरील सैनिकांसाठी रवांना केल्या.
सविस्तर वृत्त असे, आॅगस्ट महिना म्हणजे राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आणि याचेच औचित्य साधून २ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट दरम्याने हर घर तिरंगा अंतर्गत फलकलेखन, रंगावली प्रदर्शन, चित्रकला यांचेसह तिरंगी राख्या तयार करणे आदि उपक्रम सुरु असून, दापोलीत गत २५वर्षापासून सुरु असलेल्या राष्ट्र रक्षाबंधन अर्थात आझाद हिंद ट्रस्ट कोल्हापूर यांचे मार्फत सिमेवरील सैनिकांना राख्या पाठवून त्यांचेप्रति प्रेमभाव व्यक्त करीत मुख्या.संजय मेहता यांनी ट्रस्टचे दापोलीतील समन्वयक प्रा.संदिप वारके यांचेकडे सिमेवरील सैनिकांना देण्यासाठी राख्या सुपूर्द केल्या.
मुख्याध्यापक संजय मेहता, शिक्षक समीर ठसाळ, सुरेश पाटील यांचे मार्गदर्शनात तयार केलेल्या तिरंगी राख्या पाहून केंद्रप्रमुख संजय जंगम भारावून गेले. त्यांनी समाधान व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.