(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे गावच्या कन्या सुनिता सुर्वे (सौ. काजल परेश नाईक) सध्या मुंबई येथे मीरा – भाईंदर प्रहार जनशक्ती आणि ठाणे जिल्हा जिल्हाध्यक्षा प्रहार दिव्यांग क्रांती संस्था म्हणून कार्यरत आहेत.
गोरगरीब व दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळवून देणे हे ध्येय समोर ठेऊन मनापासून काम करत आहेत. उपोषण, आंदोलन करणे, शासन – प्रशासनाला जाब विचारणे,गरिबांना तसेच दिव्यांगाना दुकानं, व्यवसाय यांचे परवाने मिळवून देणे, अन्याय होत असल्यास आवाज उठवणे. असे कार्य सुनिता सुर्वे (सौ काजल परेश नाईक) करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण २४ आंदोलन केली. तसेच ती सर्व यशस्वी ही करून दाखवली. या सर्वांमध्ये त्यांना माजी मंत्री बच्चू कडू ( अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष) यांचा पाठिंबा महत्वाचा ठरला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना “शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पुरस्कार मूर्ती सुनिता सुर्वे (सौ. काजल नाईक) यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.