(चाफे / हरेश गावडे)
चाफ्याच्या फुलांनी बहरलेला चाफे गाव, अलीकडे जुन्या बांधावरती सुकलेल्या पडलेल्या अवस्थेत आज याच फुलाच लेण दुर्मिळ अवस्थेत पहायला मिळते, ज्यावेळी झेंडूची लागवड कोकणात अवतरली नव्हती तेव्हा लोकांच्या शेतीवाडीतून या फुलाची महक गुंजाव करत होती. सध्या हा गाव फक्त चाफा म्हणून प्रसिद्धीस आला आहे, परंतु ज्यानं नाव दिलं त्याला जगवण मात्र लोकांना जमत नाहीये. हा चाफा जुन्या पिढीने जपला तो पुन्हा बहरवा, आईचा गोंधळ आणि रंगाची अशी उधळण व्हावी की, या बांधावरील मेलेल्या चाफ्याला सुद्धा कोंब यावा…
आज रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी शिमगोउस्त्वात उधाण आलं आहे, गावची रयत, मानकरी, गावकरी , चाकरमानी, सगळेजण आपल्या गावाला, गावातील माणसांना आपल्या परंपरेला संस्कृतीला येणाऱ्या पिढीला काही देणं करावं म्हणून वर्ष वर्ष या क्षणांची वाट बघत असतो, वर्ष वर्ष या गावापासून कित्येक कोश दूर असूनी फक्त डोळ्यात आपलं गाव आणि आपली संस्कृती याचीच ओढ लागलेली असते
चाफे गाव हे इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवावं असं एक गाव आहे, तीर्थक्षेत्र गणपतीपुळ्याच्या अगोदर काही दहा की.मी.अंतरावर हे गाव वसलेले आहे, शैक्षणिक ,
सामाजिक क्षेत्रात या गावाची उतुंग भरारी आहे. आसपासच्या असंख्य हजारो मुलांना त्यानं आपल्या छायेत घेतलं, त्यांना गरुड झेप घेण्याची संधी दिली. तसेच धार्मिक क्षेत्रातही आज नावलौकिक असणार हे गाव असून,.आज शिमगो उस्तव मोठ्या उत्साहात साजरा होताना पहायला मिळतो. चाफे गावची ग्रामदेवता, सोंबादेव,वरदान देवी, चंडिका देवी, सालबायदेवी, मानाई देवी आज मंदिरात पहायला मिळतात. आज देवीच रूप लागलं असून देवीची पालखी गावच्या रहिवाशी रयत मंडळींनी आनंदाने हर्षभराने जल्लोषात सजवली, आईचे चांदीच्या रूपात असलेली रूप पालखीत बसवून सज्ज झाली असून ही गावची पांढर गावभोवणीला आतुर झाली आहे. गावच्या वेशीवर शिमग्या मांडावर ही आई माऊलीची पालखी ढोल ताशांच्या गजरात भक्तांच्या पाऊलखूनांनी रंगत ढंगत, सानेवर येवून विराजमान झाली आहे. या क्षणाला आज अनवाणी पायांनी भक्तजन महिनाभर या माऊली लां आपल्या अंगाखांद्यावर खेलवणार असून तिचा उदो उदो करत एकदिवस पुन्हा तिची सांगता घेईल, आणि पुन्हा वर्षभर तिची वाट बघत बसेल.
खरच पूर्वजांनी दिलेली ही अनमोल भेट आजही हा कोकणी माणूस धडपडत आहे. उद्याच्या पिढीला प्रेरणादायी क्षण देण्यासाठी हा कोकणी माणूस झुंजतो आहे. त्यांच्या कष्टांना, त्यागाला आई माऊलीने स्वीकारावं आणि त्यांना प्रचंड शक्तीपीठ देवून तुझा गौरव करण्यात सदैव सज्ज ठेवावं. चाफे गाव हा अठरापगड जातींनी विखुरलेला असून सर्वजण गुण्याआंनदाने एकजुटीने, प्रत्येक क्षण करताना दिसतो आणि हा गाव अश्या क्षणांनी सदैव बहरून येतो, नेहमीच येत राहो आणि या चाफ्याचा बांधावर कुठेतरी चाफ्याचे असंख्य रंगांची फुले, असणारी झाड पुन्हा बहरूदे आणि हे चाफे गाव तुझ्या उत्कर्षाने रंगांची उधळण करण्या तत्पर राहुदे…