(देवरूख / सुरेश सप्रे)
भारतीय जनता पक्षाच्या संगमेश्वर तालुका दक्षिण अध्यक्ष पदी हातीव गावातील युवानेते रुपेश राजन कदम यांची फेर निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील २१२१ मंडल पैकी रत्नागिरी जिल्ह्यातील १९ मंडल गठीत करण्यात आली. त्यानुसार आज भारतीय जनता पक्षाच्या संगमेश्वर तालुका कार्यालय देवरूख येथे संपन्न झालेल्या बैठकीत संगमेश्वर तालुका दक्षिण च्या मंडल अध्यक्ष पदी रुपेश कदम व उत्तर अध्यक्ष पदी विनोद म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रुपेश कदम हे माजी जिप अध्यक्षा व माजी राज्य महीला आयोगाच्या सदस्या रश्मी कदम यांचे सुपुत्र आहेत. ते यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. गतवर्षी त्यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती. भाजपाच्या राज्यातील सर्व मंडल गठीत करण्यासाठी राज्यभरात रविवारी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच भाग म्हणून संगमेश्वतालुक्यातील दोन मंडल प्रमुखाची निवड करण्यासाठी पक्ष निरीक्षक मनोज पाटणकर यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत संगमेश्वर तालुका दक्षिण अध्यक्ष पदी हातीव गावातील युवानेते रुपेश राजन कदम तर उत्तर अध्यक्ष पदी शृंगारपूर गावातील विनोद म्हस्के यांची एकमताने फेर निवड करण्यात आली आहे. रुपेश कदम व विनोद म्हस्के यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने या दोन्ही पदावर पुढील दोन वर्षांसाठी त्यांची फेर निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, जेष्ठ नेते मुकुंद जोशी, सुशांत मुळे, अभी शेट्ये, अभिजीत सप्रे, पांड्या आंबेकर, सुनील नटे, सुधीर यशवंतराव आदींसह विविध कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रूपेश कदम व विनोद म्हस्के यांच्या निवडीनंतर त्यांचा तालुका भाजपाचे वतीने सत्कार करण्यात येवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कदम व म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली तालुका भाजपाची नवी कार्यकारणी लवकरच गठीत करण्यात येणार आहे.