(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या सुतारवाडी, वाडा येथील दिव्या विजय बोंडकर (वय वर्ष 19) ही मुलगी 24 जून रोजी संध्याकाळी 3 वाजताच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली असून तिचा अद्याप कोठेही तपास लागला नाही. दिव्या हिचे वडील विजय आळकृष्ण बोंडकर यांनी त्याच दिवशी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
सुतारवाडी, वाडा येथे राहणाऱ्या विजय बाळकृष्ण बोंडकर यांची 19 वर्षीय मुलगी 24 जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेली. ती घरात नसल्याचे व उशिरा पर्यंत न आल्याने तिच्या कुटुंबियांनी आजूबाजूला, नातेवाईक तसेच मैत्रिणींच्या येथे चौकशी केली असता ती कोठेच मिळून आलेली नाही. तसेच तिचा मोबाईल घरातून जाताना बरोबर नेला आहे. त्या मोबाईल सिमकार्ड क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल स्विच ऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही. बाळकृष्ण बोंडकर यांनी त्यांची मुलगी दिव्या बेपत्ता झाल्याची खबर संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.
5 फूट उंच, रंग गोरा,लांब काळे केस, काळे डोळे, मध्यम बांधा, सरळ नाक असा वर्ण असून ,घरातून जातेवेळी नेसनीस गुलाबी रंगाचा टॉप,काळ्या रंगाची लेगीज, पांढऱ्या रंगाचा ओढणी परिधान केली होती.तरी सदरची बेपत्ता मुलगी दिसून आल्यास व काही माहिती असल्यास त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन संगमेश्वर पोलिसांनी केले आहे.