(लांजा)
तालुक्यातील भडे (तोरस्करवाडी) येथून २७ वर्षीय विवाहिता ३ जुलै रोजी सकाळी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाली असून, तिच्या वडिलांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गौरी उर्फ योगिता जनार्दन फोडकर (वय २७, रा. तोरस्करवाडी, भडे, ता. लांजा) हीने आपल्या वडिलांना “मुंबईला कामासाठी जाते” असे सांगून ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घरातून निघाली. वडिलांनी तिला एकटी न जाता सोबत येण्याचा आग्रह केला असता, तिने नकार दिला. त्यानंतर ती परत आलीच नाही.
वडिलांनी तिचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांकडे व आजूबाजूला चौकशी केली, मात्र ती कोठेही आढळून आली नाही. अखेर तिचे वडील रामचंद्र विठ्ठल तांबे (वय ५९, रा. भडे, ता. लांजा) यांनी ७ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.
बेपत्ता महिलेचे वर्णन :
रंग – निमगोरा,
शारीरिक बांधा – सडपातळ,
उंची – ५ फूट २ इंच,
केस – मध्यम लांबीचे,
चेहरा – गोल,
कानात झुमके, हातात हिरवी बांगडी,
अंगात पिंक रंगाचा पंजाबी ड्रेस, पांढऱ्या व लाल रंगाची ओढणी,
पायात पांढऱ्या रंगाची सँडल.
लांजा पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील वर्णनाची व्यक्ती कोठे आढळून आल्यास तात्काळ लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल नासिर नावळेकर हे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.