(संगमेश्वर / एजाज पटेल)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबेड खुर्द नं. १ या शाळेत दिनांक 30 /8 /2024 रोजी धामणी व अंतरवली केंद्राचे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी झाली. या शिक्षण परिषदेसाठी दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. केंद्रप्रमुख श्री जंगम, सरपंच श्री फणसे, शाळा व्य. समिती अध्यक्ष श्री राकेश कांबळे, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्री कदम गुरुजी, सी.जी.कांबळे, श्री प्रवीण कांबळे या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर परिपाठ सादर केला.
श्री वाडेकर यांनी सर्वांचे पुष्प देऊन स्वागत केले. शिक्षण परिषदेचे प्रस्ताविक श्री जंगम यांनी केले. तर श्री कदम गुरुजी यांनी शाळेविषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना सरपंच श्री फणसे यांनी श्री वाडेकर सर व श्रीम.जाधव मॅडम यांनी शाळेत केलेल्या कामाचे कौतुक केले. श्रीमती नरवाडे मॅडम यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरण या विषयावर मार्गदर्शन केले. श्री आडे यांनी केंद्र संसाधन गट गठन व पुनर्घटन या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर केंद्रप्रमुख श्री जंगम यांनी केंद्र संसाधन गट स्थापन केला, श्रीमती राऊत मॅडम यांनी स्पोकन इंग्लिश या विषयावर मार्गदर्शन केले. तर श्री जंगम यांनी प्रशासकीय विषय चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. श्री कुंभार व श्रीम.शेलार मॅडम यांनी कार्यक्रमाविषयी आपले विचार व्यक्त केले व आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाडेकर यांनी केले.