(प्रकाश चाळके / देवळे)
“माझा शब्द हेच माझे वचन” या भूमिकेला अनुसरून आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून भडकंबा गावातील पहिल्या विकासकामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष उर्फ बाळू जामसांडेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणून भडकंबा पेटवाडीतील जिल्हा परिषद शाळा गेट ते बोरवेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी मिळाली आहे.
ग्रामपंचायत सदस्य सौ. अंतरा भोसले आणि सौ. जान्हवी जामसांडेकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी उपसरपंच केतन दुधाणे, माजी सरपंच शेखर अकटे, नंदन जोशी, प्रथमेश शिंदे, आठल्ये सर, कुवळेकर गुरुजी, रामचंद्र शिंदे, सौ. रेवा आठले, सौ. सीमा आठल्ये तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच विद्यार्थ्यांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सर्व हवामानात उपयोगी असा मार्ग उपलब्ध होणार आहे.

