(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
घरची परिस्थिती बेताची, घरापासून सुमारे १२ की. मी.अंतरावर असलेली शाळा, केवळ जीवनात मोठं व्हायचं या जिद्दीने अविरत मेहनत करणाऱ्या धामापूर च्या आर्या दिनेश पडये हिने ९९ टक्के गुण मिळवत माखजन इंग्लिश स्कूल मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. व १९१८ सालापासून आजवर प्रशालेत सर्वोच्च गुण मिळवण्याचा बहुमान पटकावला. या जिद्दीची दखल घेत माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर साठे व मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी तिचे घरी जाऊन कौतुक केले. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सचिव दीपक पोंक्षे, मनोज शिंदे, संजय सहस्त्रबुद्धे, दीपक शिगवण, सचिन साठे, संतोष कुलकर्णी उपस्थित होते.
याप्रसंगी आर्या च्या आईवडिलांचे व कुटुंबियांचे अभिनंदन केले. आर्या हिला भविष्यात प्रशासकीय अधिकारी होण्याची तीव्र इच्छा आहे.ग्रामीण भागात राहून देखील, प्रयत्न केले तर आपण हि यशाला गवसणी घालू शकतो हे आर्या ने दाखवून दिले आहे.
दरम्यान यावेळी ९८.२०% मिळवत द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या आर्यन किशोर तांबट(माखजन), तर ९४.४०% मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेल्या श्वेता सुरेश कातकर हिला घरी जाऊन संस्था संचालक व मुख्याध्यापिका यांनी अभिनंदन व कौतुक केले.
प्रशालेने यावर्षी ही १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी १०५ विद्यार्थी एस एस सी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते.शाळेच्या निकलाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.