(जाकादेवी / वार्ताहर)
लांजा तालुक्यातील तळवडे गावचे देशभक्त दिवंगत माजी सैनिक सखाराम येसू कदम यांच्या पत्नी श्रीम. मालतीबाई सखाराम कदम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दि.१६ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले.
दिवंगत मालतीबाई सखाराम कदम या अत्यंत सुस्वभावी, संयमी, मनमिळावू, कष्टाळू आणि परोपकारी होत्या. त्यांच्या अंगी कडक शिस्त होती. त्यांना ताई या टोपण नावाने ओळखले जात.
अतिशय निष्ठेने त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले. त्यांच्या पश्चात त्यांची सून, नातू, मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवारी २७ एप्रिल रोजी तळवडे येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या निधनाबद्दल लांजा तळवडे विभागातून दुःख व्यक्त होत आहे.