(लांजा / प्रतिनिधी)
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थार कार 50 फूट दूर फरफटत जाऊन संरक्षक कठड्यावर जोरदार धडकली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. हा अपघात सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथील आसगे फाटा नजीक घडला.
या घटनेत थार कार (क्र. एम. एच. 01, ईबी- 7671) मुंबई येथून सिंधुदुर्ग-कुडाळ च्या दिशेने निघाली होती. भरधाव असणाऱ्या कार अपघाताचा थरार एव्हढा भयावह होता की, कार महामार्गावर 50 फूट फरफटत जाऊन दोनवेळा कलंडली. उलटी झालेल्या कारच्या पुढील व मागील बाजूचे नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली. मुंबई येथून कुडाळच्या दिशेने ही कार निघाली होती. ती देवधे येथे आली असता भरधाव असणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.त्यानंतर कारने चारही चाके उलटी झाली. चित्रपटातील विचित्र अपघात झाल्यासारखा हा सर्व क्षण असावा, त्यामुळे अपघात घडल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली होती.
कारमध्ये एकूण चारजण प्रवास करत होते. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मोठा अपघात होऊनही सुदैवाने चारही प्रवासी बचावले. मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी अपघातग्रस्ताना मदतकार्य केले.