( रत्नागिरी )
स्टेट बँक ऑफ इंडिया ने हज यात्रेकरूंसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर उपयुक्त उपक्रमाची सुरुवात करून हज यात्रेकरूंना उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या कार्ड मुळे हज यात्रेकरूंना रक्कम हाती बाळगण्याची आवश्यकता नाही. विना सर्विस चार्ज ही सेवा दिली जाते.
रत्नागिरी जिल्ह्यात हज यात्रेकरूंना ही सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. रत्नागिरी विभागीय कार्यालयातील कर्मचारी संदेश सातवडेकर, ऋषीकेश तसेच खारेघाट रोड रत्नागिरी येथील कर्मचारी प्रभू चाबूकस्वार आदी कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. फाॅरेन ट्राॅव्हेल कार्ड सुरू होण्या साठी समाजसेवक एजाज महमूद इब्जी यांनी प्रयत्न केले होते. सदर कार्ड बॅंकेने देण्यास सुरुवात केल्याने एजाज इब्जी यांनी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच हज यात्रेकरूंना हे कार्ड घेण्यासाठी आवाहन केले आहे.