(नाणीज)
श्रीमत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आज सहकुटुंब नाणीज येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. राज्यात सुरू असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांच्यासमवेत प.पू. कानिफनाथ महाराज आणि सौ. सुप्रियाताई उपस्थित होत्या.
मतदानानंतर बोलताना रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणाले, “लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हे आपले कर्तव्य समजून लोकशाहीचा हक्क म्हणून मतदान करावे.”
त्यांच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रावर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अनेक मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून आला.
फोटो: नाणीज येथे मतदान केल्यानंतर श्रीमत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यासमवेत प.पू. कानिफनाथ महाराज व सौ. सुप्रियाताई.

