(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखाधिकारी ( प्रबंधक) श्री प्रविण कुमार मेंन्डू (मछलीपट्टण्णम, आंध्रप्रदेश ) यांना की-बोर्ड वाद्य संगीत या वाद्य प्रकारात गिनीज वर्ड बोर्डने सन्मानित केले आहे. म्युझिक स्कूल हैदराबाद- आंध्रप्रदेश यांच्यावतीने १ डिसेंबर २०२४ रोजी विजयवाडा आंध्र प्रदेश येथे की-बोर्ड वाद्य संगीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत बँक ऑफ इंडिया जयगड शाखेचे शाखाधिकारी प्रविण कुमार मेंन्डू यांनी एकत्रित सहभाग घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्वकर्तृत्वाने नाव अजरामर केले आहे. इंस्टाग्रामवर एका तासात अपलोड केलेली की-बोर्ड वाद्याला संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकार रसिक लोकांनी सर्वाधिक पसंती दिली. विश्वविक्रम करणारे प्रविण कुमार मेंन्डू यांना उतुच्छ कामगिरी बद्दल त्यांना १४ एप्रिल रोजी हैदराबाद आंध्र प्रदेश येथे वरिष्ठ मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विजयवाडा हैदराबाद आंध्र प्रदेश येथील श्री.ऑगस्टीन दांडीगी वेगूगोपाल व हॅलेल म्युझिक स्कूल यांनी हे साध्य केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या प्रवीण कुमार मेंन्डू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.