(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेव येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या जाकादेवी केंद्रावर शासकीय रेखा कला एलिमेंटरी परीक्षा सुरू झाली असून या केंद्रावर १५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत
जाकादेवी ग्रेड परीक्षा केंद्रावर जाकादेवी, आगरनरळ ,देऊड, धामणसे, पोचरी, विल्ये, फुणगुस अशा सात विद्यालयातील कलेचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक नितीन मोरे तर उपकेंद्र संचालक म्हणून कलाध्यापक प्रणित जाधव हे काम पाहत आहेत.
परीक्षा यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील कलाशिक्षक मेहनत घेत आहेत. इलेमेंटरी अँड इंटरमिजिएट परीक्षा २७ तारखेपर्यंत चालणार आहे. इंटरमिजिएट परीक्षेसाठी १२० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा मालगुंड शिक्षण संस्थेने पुरवल्या आहेत.

