(रत्नागिरी)
दिनांक ०९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या 58 व्या युवा महोत्सवाची वक्तृत्व (मराठी )स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेमध्ये कुमारी सानिका सुभाष खर्डे (द्वितीय वर्ष वाणिज्य) हिला कांस्यपदक प्राप्त झाले.
या स्पर्धेसाठी “भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यामध्ये व विकसित भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये तरुणाईची भूमिका ” हा विषय देण्यात आला होता. सादरीकरणासाठी तिला चार ते पाच मिनिट इतका वेळ देण्यात आला होता.
तिच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा प्रा.ऋतुजा भुवड, इतर सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

