(जैतापूर / राजन लाड)
जिल्हा परिषद शाळा नाटे कोकरी येथील इयत्ता चौथीतील स्वराज संतोष करळकर याने नुकत्याच झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. स्वराज याने मंथन परीक्षेमध्ये याने 300 पैकी 252 गुण घेऊन केंद्र स्तरावर पहिला नंबर, विभाग पातळीवर 19 तर राज्यस्तरीय यादीत राज्यात 25 वा नंबर प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले.
स्वराजचे आई-वडील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असून आई सागरी पोलीस ठाणे नाटे येथे तर वडील संतोष करळकर हे पूर्णगड सागरी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. स्वराजच्या मंथन परीक्षेतील यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ तांबे यांसह सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका इनामदार मॅडम आणि केंद्र प्रमुख सुनील जाधव तसेच पालकांनी अभिनंदन केले आहे.