(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील हरहुन्नरी युवा उद्योजक भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सरचिटणीस राहुल फाटक यांचे काही दिवसांपुर्वी अकाली दुःखद निधन झाले. कै. राहुल फाटक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तालुका भाजपावतीने भाजपा कार्यालय देवरुख येथे शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत उपस्थित मान्यवरांकडून कै.राहुल यांच्या आठवणी जागवत मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
राहूलने व्यवसाय करताना सामाजिक जाणीवेतून विविध मंडळ. शैक्षणिक संस्थामधे काम करताना झोकून दिले. तसेच संघ व भाजपाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ही वेगळी छाप पाडली होती. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी निर्माण ओळख केली होती. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी वक्तशीरपणा जोपासला. त्यांनी एखादा विषय हाती घेतला तर तो धसास लागेपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करत होते, असे गौरवोद्गार युवानेते अभी शेट्ये काढत यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कोणत्या ही कामात जी तळमळ असावी लागते, ती राहुल जवळ ओतप्रोत भरलेली होती. सामाजिक भान असणारा तरुण कार्यकर्ता व यशस्वी उद्योजक म्हणून अल्पावधीत राहुलने स्वतःची ओळख निर्माण केली होती, असे मनोगत निलेश भुरवणे यांनी व्यक्त केले
पदाची अपेक्षा न ठेवता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जबाबदारीने व निष्ठा जोपासत काम करून पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तन, मन, धनाने दिलेले योगदान वादादीत होते. त्याच पक्षनिष्ठेचा आर्दश ठेवत काम करून दाखविणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांनी सांगितले.
राहुल हा सर्व जाती धर्माच्या मंडळींच्यात वावरणारा मोकळ्या मनाचा दिलदार कार्यकर्ता होता. त्याचे अकस्मात जाणे धक्कादायक असून ती पोकळी भरून काढण्यासाठी बळ मिळो अशी भावना सुशांत मुळे यांनी व्यक्त केली. शेवटी राहुल फाटक यांचे काका पांडूरंग फाटक यांनी आपण अल्पावधीत आपला तरूण पुतण्या गमावल्याची भावना व्यक्त करत राहुलच्या जाण्याने आम्हा फाटक परीवारची फार मोठी हानी झाली असून ही हानी कधीही भरून न येण्यासारखी आहे, अशी भावना व्यक्त केली.
शोकसभेला तालुका भाजपाचे नेते मुकुंद जोशी, तालुकाध्यक्ष रुपेश कदम, विनोद म्हस्के, प्रमोद अधटराव, बबन किर्वे, माजी नगरसेवक कीर्व प्रमोद शिंदे यांचेसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.