(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
आज 10 एप्रिल हा भूमापन दिन मोठ्या उत्साहात देवरुख येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर भूमी अभिलेखचे उप अधीक्षक श्री. संतोष भागवत हे होते. भूमी अभिलेख चे अनेक निवृत्त अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमांस आवर्जून उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांस सुरुवात झाली. त्यानंतर चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भूमी अभिलेख विभागाच्या प्रगतीचा आढावा, नवनवीन योजना, व तांत्रिक कामाची माहिती देणेत आली. यावेळी माजी अधिकारी श्री. आत्माराम उर्फ बाळ जाधव, अजित मोहिरे, धने साहेब, रमेश गमरे, अनंत भुवड आदी मान्यवर हजर होते.