(मुंबई / सुरेश सप्रे )
राज्यातील दि. ०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत, दि. २३.१२.२०२४.काढलेल्या आदेशाला आता ३०जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने वाहन मालकांना दिलासा मिळाला आहे.
दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१/ ०३ / २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी गतीने झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या आदेशाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी / उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा टॅक्सी /बस ट्रक संघटनाची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे.असे आदेश विवेक भीमनवार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दीले आहेत.
हि प्रक्रिया आँनलाईन असल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आता या प्रक्रिया मुदतवाढ मिळाल्याने खेड्यापाड्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.