(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील सम्राट फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा राजेश जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. खंडाळा येथील खंडाळा इंग्लिश मेडियम स्कूल येथे हे मार्गदर्शन दिनांक 23 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता संपन्न होणार आहे.
या मोफत करिअर मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक विनोदकुमार सिंग उपस्थित राहणार आहेत. सम्राट फाउंडेशन वाटद खंडाळा आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा राजेश जाधव यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मोफत करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत करियर मार्गदर्शनासाठी खंडाळा परिसरातील सर्व विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक असणाऱ्या करियर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सम्राट फाउंडेशन वाटद खंडाळा व माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा राजेश जाधव यांनी केले आहे.