( गुहागर / रामदास गमरे )
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळच्या वतीने आयोजित ऋतुरंग २०२४ या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत गिमवी विभाग क्र. ३ चे अध्यक्ष राजेश मोहिते व विभागीय महिला हिशोब तपासनीस सौ. शुभांगी राजेश मोहिते या उभयतांची कन्या रुची राजेश मोहिते हिने प्रथम क्रमांक पटकावला.
सेमी इंग्लिश माध्यम, प्राथमिक शाळा मार्गताम्हणे, चिपळूण या शाळेत इयत्ता ४ थी मध्ये शिकणारी रुची राजेश मोहिते ही लहानपणीपासूनच कलासक्त असून अभ्यासू व मेहनती आहे, चित्रकलेत पारंगत रुची अभ्यासासोबतच कलेची आवड जोपासत आपल्या आईवडिलांचे, शाळेचे, गावाचे, विभागाचे, तालुक्याचे नाव उंचावत आहे. त्यामुळे बौद्धजन सहकारी संघ, विभाग क्र. ३ च्या वतीने कु. रुची राजेश मोहिते व तिच्या पालकांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.