(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील ओम साई शांती ग्रुप च्या वतीने गणपतीपुळे पंचक्रोशीतील मराठी माध्यमाच्या शाळांमधून हस्ताक्षर सुधार उपक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत सुंदर हस्ताक्षर साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे ओम साई शांती ग्रुपने जाहीर केल्यानंतर त्यामध्ये त्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे तीन गटांमधून क्रमांक काढण्यात आले.
पहिले तीन क्रमांक व उत्तेजनार्थ प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच ओम साई शांती ग्रुपच्या वतीने करण्यात आला. यावेळी सर्व क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना ओम साई शांती ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विनायक सावंत व त्यांचे सहकारी संदीप रहाटे, अमोल गुरव, उमेश चव्हाण, पंढरीनाथ पवार ,प्रथमेश सागवेकर, सुदेश चव्हाण आदींच्या हस्ते बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले.
या हस्ताक्षर सुधार उपक्रमामध्ये गणपतीपुळे पंचक्रोशीतील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये मालगुंड दुर्गवळीवाडी येथील प्राथमिक शाळेतील गट क्रमांक एक मध्ये स्वरा महेश दुर्गवळी प्रथम, अन्वी विनेश मांडवकर द्वितीय तर गट क्रमांक दोन मध्ये सिद्धी धनेश दुर्गवळी प्रथम ,ऋतुजा शिरीष शितप द्वितीय, त्यानंतर खालची निवेंडी भगवतीनगर पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये दुर्वा अभिषेक कोलथरकर, आर्यन आदिश चौगुले, इयत्ता दुसरीमध्ये सार्थक नितीन यादव, यशिका विनायक भोसले, इयत्ता तिसरीमध्ये सौमी सुशिल भुते, स्पंदन विवेकानंद शेंडगे,मनवा अजित पावसकर, इयत्ता चौथीमध्ये अनुष्का स्वप्निल रावणंग, ईश्वरी महेंद्र घाणेकर, वंश विश्वास जाधव, तर इयत्ता पाचवीमध्ये वैष्णवी शैलेश घाणेकर, आयुष दिनेश जाधव, पार्थ रमेश ठोंबरे, इयत्ता सहावी मध्ये साई जितेंद्र कातळकर, प्रज्वल प्रदीप लोगडे तर सातवीमध्ये अथर्व अंकुश जाधव या विद्यार्थ्यांनी क्रमांक प्राप्त केले.
तसेच मालगुंड तळेपाठ नंबर दोन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रांजल धनंजय मेस्त्री तर इयत्ता तिसरी आणि चौथी मध्ये सानवी अक्षय पवार प्रथम, भक्ती निलेश अभ्यंकर द्वितीय आणि आराध्या अभिषेक पवार तृतीय यांनी क्रमांक प्राप्त केले. तसेच गणपतीपुळे प्राथमिक शाळेमध्ये उत्कर्षा उमेश मोहिते इयत्ता चौथी प्रथम ,अखिल मुबारक सुतार इयत्ता तिसरी द्वितीय आणि ओम संजय घाणेकर इयत्ता चौथी तृतीय तसेच इयत्ता पहिलीमध्ये ओवी दिनेश चव्हाण प्रथम, दुसरीमध्ये आदिती विनोद लाड द्वितीय, तन्मय प्रशांत मांडवकर इयत्ता पहिली तृतीय आणि काव्य चिंतामणी कळंबटे इयत्ता दुसरी उत्तेजनार्थ आदींनी क्रमांक प्राप्त केले. त्यानंतर वरची निवेंडी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये परिधी नवनाथ माचिवले, रुद्र संदीप गावडे इयत्ता तिसरी व चौथी मध्ये परिधी मोहन शिगवण, आर्यन शिवाजी नेवरेकर ईशान प्रणव काणे आणि इयत्ता पाचवी सहावी मध्ये आर्या मोहन शिगवण त्याचबरोबर इयत्ता सातवी आठवी मध्ये प्रांजली सुभाष पात्त्ये आणि श्रावणी सतीश फेपडे आदी विद्यार्थ्यांनी क्रमांक प्राप्त केले.
मालगुंड नं.१ मध्ये नील सुहास भातडे, शितपवाडी शाळेमध्ये सिया योगेश शितप,भंडारपुळे शाळेमध्ये हर्षा नितीन सुर्वे यांनी क्रमांक प्राप्त केले. या सर्व क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन ओम साई शांती ग्रुपच्या वतीने बक्षीसांच्या स्वरूपात गौरविण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने ओम साई शांती ग्रुपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देण्यात आले तसेच हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल पालक व ग्रामस्थांनी विशेष ऋण व्यक्त केले.